Sunday, July 24, 2011

सुधारित मानव विकास मिशन योजना

गजानन. वि. काळे  गट साधन केंद्र मंठा
मागास तालुक्यांना प्रगतशील तालुक्यांच्या इतरांच्या बरोबर आणण्यासाठी 2006 सालापासून 25 अतिमागास तालुक्यात राबविण्यात आलेल्या 'मानव विकास मिशन'च्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले. त्यामुळे या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून हे मिशन पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक सव्वाशे तालुक्यात राबविण्यात येईल आता या तालुक्यांना वर्षाकाठी तीन ते पाच कोटींचा निधी उपलब्ध होईलया माध्यमातून संबंधित तालुक्यात शिक्षण, आरोग्य, बालकल्याण आणि दरडोई उत्पन्नवाढीच्या योजना राबविण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली  मिशनच्या जिल्हा पातळीवरील अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष तर जिल्हा नियोजन अधिकारी सचिव राहणार आहेत. तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी अध्यक्ष तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सचिव राहणार आहेत. जालना जिल्ह्यातील परतूर, बदनापूर, जालना, घनसावंगी, आंबड, भोकरदन, मंठा, जाफराबाद या तालुक्यांचा समावेश आहे.  या समितीच्या वतीने शिक्षण, आरोग्य बालकल्याण, उत्पन्न वाढीच्या योजना या तीन प्रकारात काम करण्यात येणार आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग , मोठ्या गावातील माध्यमिक शाळांत अभ्यासिकेसाठी सोलर लाईट, फनिर्चर, पुस्तकखरेदी, ग्रामीण विद्यार्थ्यांना बारावीपर्र्यंत वाहतूक सुविधा, प्रयोगशाळांसाठी साहित्याची मदत, तालुक्याच्या ठिकाणी बालभवन विज्ञानकंेद, तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी औषधोपचार, बेकार युवकांना स्वयंरोजगारासाठी व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण, बचतगटाच्या माध्यमातून परसबाग, किचन गार्डन योजना, फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे अशा कार्यक्रमांचा या मिशनमध्ये अंतर्भाव आहे.

सदरील लेख www.gvkale.blogspot.com वर उपलब्ध आहे